महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bengaluru Suicide : दहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या - बेंगळुरूमध्ये तरुणीची आत्महत्या

बेंगळुरूच्या चालुक्य सर्कल येथील एचपी अपार्टमेंटमध्ये 10व्या मजल्यावरून खाली उडी मारून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Suicide
आत्महत्या

By

Published : Feb 27, 2023, 9:42 AM IST

बेंगळुरू (कर्नाटक) :हायग्राउंड्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत रविवारी रात्री एका विद्यार्थ्यीनीने अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. संजय नगर येथील रहिवासी असे मृत तरुणीचे नाव आहे. मुलगी चालुक्य सर्कल येथील एचपी अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्यावरून पार्क केलेल्या कारवर पडली. खाली पडून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मुलीचे वय 16 ते 18 वर्षांदरम्यान आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : मुलीचे वडील अरविंद हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून आई तेजू कौशिक या गृहिणी असल्याची माहिती मिळाली आहे. हे दाम्पत्य संजय नगर येथे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आत्महत्या करणारी मुलगी अपार्टमेंटमध्ये फिरत होती. तिचे कुटुंब एचपी अपार्टमेंटमध्ये राहत नाही जिथे तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने शेजारच्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षारक्षकांनी तिला आत जाऊ दिले नसल्याची माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू :हैदराबादमध्ये व्यायाम करत असताना एका पोलिस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी प्रयत्न करूनही ते त्याला वाचवू शकले नाहीत. विशाल असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटका येऊन तो जिममध्ये कोसळल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 24 वर्षीय कॉस्टेबल विशाल सिकंदराबादमधील गौस मंडी भागात 2020 पासून हवालदार म्हणून कार्यरत आहे. संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी संपवून घरी गेला. घरी गेल्यानंतर फ्रेश होऊन तो जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला. जिममध्ये मित्रांसोबत थोडावेळ हँग आउट केल्यानंतर त्याने वर्कआउट करायला सुरुवात केली. मात्र व्यायाम करतानाच तो काही सेकंदातच खाली कोसळला.

रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला : विशाल असा अचानक कोसळल्याचे पाहून त्याचे सहकारी तातडीने त्याची मदत करायला आले. मात्र ते काही मदत करण्यापूर्वीच विशालचा मृत्यू झाला होता. हार्ट अटॅकनंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्याने कोसळल्याची विशालची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. आजकाल अशाप्रकारे अचानक येणारा हृदयविकाराचा झटका वृद्धांपासून तर लहान मुलांपर्यंत अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरतो आहे.

हेही वाचा :Joshimath Crisis: जोशीमठमध्ये संकटाची चिन्हे; सिंहधर आणि नृसिंह मंदिरादरम्यान जमिनीतून अचानक नवीन पाण्याचा प्रवाह फुटल्याने भीतीचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details