हैदराबाद :हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये दोन लहान मुले आहेत. भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पालवंचा मंडळातील जगन्नाथपुरम गावात खेळत असताना जरपुला भानुश्री (17 महिने) हिच्यावर शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात मुलीच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले जखमी :गुरुवारी संध्याकाळी राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील कोनारोपेटा मंडळ केंद्रात घरासमोर खेळत असताना बोलले सरिश्मा (4) हिच्यावर दोन कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला अनेक जखमा झाल्या. शुक्रवारी जिल्हा मुख्यालयातील बीटबाजार येथे एक सरकारी शिक्षक आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. गाडीवरील ताबा सुटलेल्या दोघांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यात खाली पडून त्यांच्या पायाला दुखापत झाली.
एका मलाचा दुर्दैवाने मृत्यू : सूर्यापेट जिल्हा मुख्यालयातील राजीवनगर येथे शुक्रवारी सकाळी दहा वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याच्या छातीवर हल्ला केला. गुरुवारी रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यात याच वसाहतीतील 11 आणि 10 वर्षीय मुलगा जखमी झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यातील एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. चावा घेणे, अंगावर धावून येणे, कुत्र्यांचे भुंकणे, यामुळे रात्री, मध्यरात्री नागरिक रस्त्यावर चालण्यास भितात. भटक्या कुत्र्यांची दहशत एखाद्या रस्त्यावर कोणीही नसल्यास त्या ठिकाणी पहायला मिळते.
मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली : मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ३ वर्षात २ लाख १४ हजार ९५० मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे अनेकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे. २०२० मध्ये ५९ हजार ७९१ कुत्र्यांनी चावा घेतला, २०२१ मध्ये ६७ हजार १६६ कुत्र्यांनी चावा घेतला, २०२२ मध्ये ८७ हजार ९९३ कुत्र्यांनी चावा घेतला, अशाप्रकारे रेबीज प्रतिबंधक लस २ लाख १४ हजार मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने देण्यात आली आहे. मुंबईत १४७ लसीकरण केंद्रांवर कुत्रा चावल्यावर रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी अशी माहिती दिली.
हेही वाचा :MP Accident : अमित शाहंच्या सभेतून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, 6 ठार, अनेक जखमी