करौली ( राजस्थान ) : हिंदू नववर्षाचे औचित्य साधून शहरात काढण्यात आलेल्या रॅलीवर ( Hindu New Year rally in Karauli) ताबे येथील तोरी हटवारा बाजारात दगडफेक करण्यात ( Karauli Stone Pelting ) आली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रुग्णालयाबाहेर जाळपोळ केली आहे. दगडफेकीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर एका गंभीर जखमीला जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Karauli Stone Pelting : हिंदू नववर्षानिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर दगडफेक.. अनेकजण जखमी - राजस्थान मराठी न्यूज
राजस्थानातील करौली येथे हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर ( Hindu New Year rally in Karauli) काही लोकांनी दगडफेक ( Karauli Stone Pelting ) केली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्टॉल्सही जाळण्यात आले. यानंतर करौलीचा बाजार बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
हिंदू नववर्षानिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर दगडफेक.. अनेकजण जखमी
या घटनेनंतर करौलीचा बाजार बंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी शैलेंद्र सिंह इंडोलियाही घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस स्थानिक लोकांकडून माहिती घेत आहेत. लोकांनी पोलिसांवरही अनेक आरोप केले आहेत. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल एकवटले आहे. शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.