कानपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी हे आज कानपूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे शहरात आगमन होण्याआधीच परेड आणि आसपासच्या परिसरात दोन गटात गोंधळ उडाला आहे. या गोंधळानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी स्फोट आणि गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हा वाद जातीय असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्किट हाऊसवर पोहोचण्यापूर्वीच शहरात दगडफेकीचे वृत्त समोर आले.
दोन समाजात दगडफेक - पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन समाजात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे. यादरम्यान स्फोट आणि गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.