महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stone Pelting At VHP Yatra : विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत दगडफेक, अनेक वाहने जाळली; इंटरनेट सेवा बंद - हरियाणाच्या नुह

हरियाणाच्या मेवात भागात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या जलाभिषेक यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही वेळातच दगडफेक आणि गोळीबारही सुरू झाला. चकमकीत 3 पोलिसांसह 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. (stone pelting at vishwa hindu parishad yatra).

Stone Pelting At VHP Yatra
विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत दगडफेक

By

Published : Jul 31, 2023, 9:13 PM IST

पहा व्हिडिओ

नूह (हरियाणा) : हरियाणाच्या नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या ब्रिज मंडल यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यावेळी वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आणि गोळीबारही करण्यात आला. हल्लेखोरांनी हातात लाठ्या घेऊन वाहनांची तोडफोड केली. दगडफेक आणि गोळीबारात आतापर्यंत एकूण 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

गोंधळ कसा सुरू झाला : हरियाणाच्या नुहमध्ये दरवर्षी ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेचे आयोजन केले जाते. नेहमीप्रमाणे यंदाही यात्रेचे नल्हडच्या शिव मंदिरापर्यंत आयोजन केले गेले होते. यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते शेकडो वाहनांतून नल्हडच्या शिवमंदिरात भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही यात्रा नल्हड येथे पोहोचताच काही उपद्रवींनी यात्रेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत यात्रेत सहभागी अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. त्यानंतर वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली.

इंटरनेट सेवा बंद : परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सेवा बंद करण्यात आली. या संदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे. या हिंसक चकमकीत आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. नल्हडमधील गोंधळानंतर बडकाली चौक, पिंगळवणसह इतर अनेक भागात तुरळक हाणामारी झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पोहोचला आहे.

परिसरातील दुकाने बंद :घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहशतीमुळे परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. ही यात्रा दुपारी एक वाजताच्या सुमारास नुहच्या तिरंगा पार्कजवळ पोहोचली, तेव्हा तेथे उपस्थित काही लोकांचा वाद झाला. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दगडफेकीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. सध्या कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा :

  1. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
  2. National Flag Tampered In Muharram : संतापजनक! मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाशी छेडछाड, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
  3. Fire in hospital basement : रुग्णालयाला लागली भीषण आग; अग्नीशमन दलाच्या प्रयत्नाने १०० रुग्णांचे वाचले प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details