महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Share Market Updates : सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वाढला, निफ्टी 16,000 पार - बीएसई सेंसेक्स लाइव न्यूज

मागील सत्रात बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स ६१६.६२ अंकांनी म्हणजेच १.१६ टक्क्यांनी वाढून ५३,७५०.९७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 178.95 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 15,989.80 वर बंद झाला.

Share Market Updates
सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वाढला, निफ्टी 16,000 पार

By

Published : Jul 7, 2022, 12:10 PM IST

मुंबई : जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वर गेला. निफ्टीही वाढीसह उघडला. यादरम्यान बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ४९८.७७ अंकांनी वाढून ५४,२४९.७४ वर पोहोचला. दुसरीकडे, NSE निफ्टी 149.7 अंकांनी वाढून 16,139.50 वर होता. टायटन, पॉवर ग्रिड, एम अँड एम, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, विप्रो आणि आयसीआयसीआय बँक हे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले.

हॉंगकॉंगच्या बाजारात घसरण :दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, मारुती सुझुकी इंडिया आणि भारती एअरटेल यांनी घसरण केली. इतर आशियाई बाजारांमध्ये टोकियो, सोल आणि शांघाय येथील बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर हाँगकाँगच्या बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. बुधवारी अमेरिकी बाजार नफ्यासह बंद झाले.

३३० कोटींची विक्री :मागील सत्रात बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स ६१६.६२ अंकांनी म्हणजेच १.१६ टक्क्यांनी वाढून ५३,७५०.९७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 178.95 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 15,989.80 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.79 टक्क्यांनी वाढून 101.49 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, बुधवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 330.13 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा :Bitcoin Rate Today : आज एक बिटकॉइन मिळत आहे 'इतक्या' रुपयांना.. जाणून घ्या आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details