मुंबई:गेले दोन दिवस शेअर बाजार (Stock market) सकारात्मक वाढताना दिसला होता, मात्र आज सुरवातील या वाढिला ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी बाजारात आठवड्याचा शेवटच्या व्यवहार होत आहे. यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 379.73 अंकांच्या घसरणीसह 57,531 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 629 अंकांच्या मोठ्या घसरणीसह (Sensex fell by 600 points) 57282 च्या पातळीवर होता. तर, निफ्टी 189 अंकांच्या घसरणीसह ( Nifty fell by 189 points) 17203 वर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बीएससी सेन्सेक्स 874 अंकांपेक्षा जास्त वाढून बंद झाला होता . रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि, या कंपन्यांचे शेअर्स मजबूत होते. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये ही भारतीय बाजारात तेजी पहायला मिळाली. सेन्सेक्स 874.18 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी वाढून 57,911.68 वर बंद झाला होता. दरम्यान, तो एका वेळी 954.03 अंकांवर चढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५६.०५ अंकांनी म्हणजेच १.४९ टक्क्यांनी वाढून १७,३९२.६० वर बंद झाला होता.