मुंबई : शेअर बाजारात आज मोठ्या घसरणीने व्यवसायाला सुरुवात झाली ( Sensex slipped below 52000 ) आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरणीसह सुरु झाले आहेत. जागतिक संकेत सर्वत्र कमकुवत आहेत आणि आशियाई बाजारातही जोरदार घसरण दिसून येत ( Stock Market Opening today ) आहे.
कसा उघडला शेअर बाजार: आजच्या व्यवहारात BSE चा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३५०.७६ अंकांनी म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घसरून ५२,४९५.९४ वर तर NSE चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ८१ अंकांच्या घसरणीसह १५६७४ च्या पातळीवर उघडला आहे.
काय आहे निफ्टीची स्थिती: बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांतच निफ्टीने 8 मार्चचा नीचांक मोडला आणि तो 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. निफ्टी आता विक्रमी उच्चांकावरून 16 टक्क्यांनी खाली आला आहे. निफ्टी सध्या 81.10 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी घसरून 15,693.30 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 50 निफ्टी समभागांपैकी केवळ 13 समभाग वाढीसह व्यवहार करत आहेत, तर 37 समभाग घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.