महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stock Market Fell : शेअर बाजार 225 अंकांनी कोसळला - शेअर बाजार निर्देशांक

शेअर बाजाराचा ( Stock Market ) निर्देशांक सोमवारी बाजार सुरू होताच 225 अंकांनी कोसळला. रिलायन्स इंडस्ट्रीज ( Reliance Industries ) आणि कमकुवत जागतिक इक्विटी बाजार यामुळे बाजार कोसळला. निफ्टीसुद्धा 70 अंकानी खाली आला.

Stock Market
Stock Market

By

Published : Jul 25, 2022, 11:19 AM IST

मुंबई -शेअर बाजाराचा ( Stock Market ) निर्देशांक सोमवारी बाजार सुरू होताच 225 अंकांनी कोसळला 55,816 वर आला. निफ्टीसुद्धा 70 अंकानी खाली येऊन आला 16,649 अंकावर आला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ( Reliance Industries ) शेअर घसरल्याने आणि कमकुवत जागतिक इक्विटी बाजार यामुळे बाजार कोसळला.

रिलायन्सचे शेअर घसरले -आज सकाळी बाजार सुरू होताच रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 3 टक्क्यांनी खाली आले. जूनच्या तिमाहित कंपनीने 46 टक्के फायदा होऊनही रिलायन्सचे शेअर्स आज 3 टक्क्क्यांनी खाली आहे. याशिवाय सन फार्मा, टेक महिंद्रा, नेस्ले, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि आयटीसी या कंपन्यांचे शेअर्सही खाली आले आहेत.

हे शेअर वधारले -काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले असताना दुसरीकडे इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, अक्सिस बँक आणि टाटा स्टीलचे यांचे शेअर मात्र वधारले आहेत. ICICI बँकेचे शेअर्स जून तिमाहीच्या नफ्याच्या घोषणेनंतर 1 टक्क्यांनी वधारले आहेत. आयसीआयसीआय बँकेला जूनच्या तिहाहित 55 टक्क्यांचा नफा दिसून आला.

हेही वाचा -आणखी एक धक्का.. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचा कारभार केंद्राच्या रडावर, आदित्य ठाकरेंच्या कामांचे होणार ऑडीट

ABOUT THE AUTHOR

...view details