भारतीय स्टील प्राधिकरण (SAIL Recruitment 2022) ने विविध पदांची भरती केली आहे. यामध्ये नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा आणि ब्लड बँक टेक्निशियन व फ्लेबोटोमिस्ट या पदांसाठी भरती (walk in interview) करण्यात आली आहे. सेल एकूण 78 पदांची भरती (78 posts job recruitment) करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.sailcareers.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासंबंधी तपशीलवार सूचना पाहू शकतात.
नर्स 40 जागा, फार्मासिस्ट 15 जागा, प्रयोगशाळा आणि रक्तपेढी तंत्रज्ञ व फ्लेबोटोमिस्ट 12 जागा, डायलिसिस तंत्रज्ञ 02 जागा, ईसीजी व ईईजी तंत्रज्ञ 02 जागा, ड्रेसर्स 05 जागा अश्याप्रकारे ही भरती होणार आहे.
भारतीय स्टील प्राधिकरणने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवार 06 व 07 डिसेंबर 2022 रोजी नियोजित वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. चुकून कागदपत्रे राहिली तर उमेदवारांना अडचणी येऊ शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी, खाली सोप्या पायऱ्या दिल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून उमेदवार अधिसूचना डाउनलोड करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांना सर्वप्रथम सेलच्या अधिकृत वेबसाइट https://www.sailcareers.com/ ला भेट द्यावी लागेल. पुढे, मुख्यपृष्ठावरील बातम्या व नोकरी विभागात जा. येथे उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा - 'बोकारो स्टील प्लांट-पॅरामेडिकल स्टाफसाठी निवड प्रवीणता प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वॉक-इन मुलाखत'. आता तुम्हाला SAIL पॅरामेडिकल भर्ती 2022 जॉब नोटिफिकेशनची PDF नवीन विंडोमध्ये मिळेल. त्यानंतर, SAIL पॅरामेडिकल भर्ती 2022 जॉब नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
तसेच, भारतीय स्टील प्राधिकरणने (SAIL) ने वरिष्ठ सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी देखील भरती केली आहे. एकूण 239 पदांसाठी या भरती प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. SAIL Recruitment 2022