ग्वाल्हेर -रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येणार स्टेट प्लेन ग्वाल्हेर विमानतळावर अपघातग्रस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार हे स्टेट प्लेन रनवे वर उतरत असताना कोसळले. या अपघातात वैमानिक कॅप्टन सईद माजिद अख्तर, सह वैमानिक जय शंकर जयस्वाल आणि एक अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान गुजरातहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा घेऊन ग्वाल्हेरला आले होते.
लँड करताना विमान पलटले -