नवी दिल्ली:पंतप्रधानांनी ट्विट करत म्हणले आहे की, "महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा. या राज्याने राष्ट्रीय प्रगतीत अभूतपूर्व योगदान दिले आहे. राज्यातील जनतेने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मी लोकांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतो " महाराष्ट्र दिन, सामान्यतः महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखला जातो, "बॉम्बे" राज्याचे भाषिक आधारावर दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले तेव्हा पासुन महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
Modi On Maharashtra Day : राज्याने राष्ट्रीय प्रगतीत अभूतपूर्व योगदान दिले आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या - महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या ( extends greetings on Maharashtra Day) आणि त्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.मोदी म्हणाले की, राज्याने राष्ट्रीय प्रगतीमध्ये अभूतपूर्व योगदान दिले आहे (state made phenomenal contributions to national progress) आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्याच्या निर्मितीची मागणी साठी अनेक आंदोलने झाली त्यामुळे बॉम्बे पुनर्रचना कायदा 1 मे 1960 रोजी अंमलात आला, पंतप्रधान मोदींनी आज गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त गुजरातच्या लोकांनाही शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की गुजराती लोक त्यांच्या विविध कर्तृत्वासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा करतात. 1 मे हा दिवस कामगार आणि कामगार वर्गाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.