रामनगर (कर्नाटक) - कोणतीही परवानगी नसताना तसेच कोरोनाचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेले असताना अशी रॅली आणि मेळाव्याला कशी परवाणगी दिली जावू शकते? कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) ची पदयात्रा थांबवण्यास राज्य सरकार सक्षम नाही का? असा प्रश्न कार्नाटक उच्च (Karnatak State Congress) न्यायालयाने उपस्थित केला होता. (action regarding Mekedatu Padayatra) दरम्यान, आज (दि. 13 जानेवारी)रोजी कर्नाटक सरकारने पदयात्रेत (Mekedatu Padayatra In karnatak) सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
मात्र, पदयात्रा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, पक्ष कार्यालयात शिवकुमार, सिद्धरामय्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी आपली पदयात्रा स्थगित केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान, येत्या काळात आम्ही भाडेवाढीवर आंदोलन करणार असल्याची माहिती सिद्धरामय्या यांनी यावेळी दिली आहे.