जम्मू कश्मीर -माता वैष्णोदेवी भवनात नवीन वर्षात चेंगराचेंगरी (Stampede occurs at Mata Vaishno Devi Bhawan) होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या भागात मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत 14 ते 15 लोकांना वाचवले आहे.
चेंगराचेंगरीत मरण पावलेले भाविक दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab) येथून आले होते. या घटनेत ठार झालेला एक भाविक हा जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) रहिवासी आहे. सामुदायिक आरोग्य केंद्राचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ गोपाल दत्त यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या आकड्यांबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात किती जण जखमी झाले याचा नेमका आकडा समोर आला नाही. चेंगराचेंगरीमुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणांच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात (Mata Vaishno Devi Bhawan) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत वाढते, त्यामुळे चेंगराचेंगरी कशी झाली, हेही कळू शकलेले नाही.
पंतप्रधानांकडून मृत्यूमुखींना 2 लाख रुपयांची मदत