कांकेर (छत्तीसगढ)- कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर आणि नर्सेस आपल्या सुख सोयींचा त्याग करत लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. या काळा अनेक ठिकाणी डॉक्टर, नर्सेस रूग्णांसोबत डान्स करताना तर कुठे रूग्णांचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाय करताना दिसून येत आहे. अशा विविध प्रकारचे फोटोज सध्या आपण समाज माध्यमात पाहत आहोत. असाच एक फोटो पखांपूरमधून पुढे आला आहे. नर्स पीपीई किट घालून जमिनीवर बसून थोडं आराम करताना दिसून येत आहे. सध्या हा फोटो समाज माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे.
पीपीई किटमध्येच जमिनीवर झोपली नर्स
नर्स कोरोना रूग्णालयात आपले काम करताना पीपीई किट घालून जमिनीवरच झोपली. या नर्सचे नाव लीलासनी कोडोपी असे आहे. त्या पखांपूर सामान्य रूग्णालयात कार्यरत आहेत. लीलासनी ह्या सध्या आयटीआय कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करत आहे. रूग्णांची सेवा करता करता त्यांना थकवा आला आणि त्या जमिनीवरच आराम करू लागल्या.