महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SSC recruitment scam: ईडीने जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड पार्था चॅटर्जींचेच.. अर्पिता मुखर्जीचा दावा - जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड पार्था चॅटर्जींचे

पश्चिम बंगालचे मंत्री पार्था चॅटर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसएससी भरती घोटाळ्यात ( SSC recruitment scam ) चॅटर्जींची मैत्रीण अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून कोट्यवधी रुपये तसेच दागिने जप्त करण्यात आले होते. हे सर्व घबाड पार्था चॅटर्जी यांचेच असल्याचे अर्पिताने ईडीच्या चौकशीत ( Huge money recovered belongs to Partha Chatterjee ) सांगितले. ( Arpita Mukherjee ED Interrogation )

SSC recruitment scam: Huge money recovered
ईडीने जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड पार्था चॅटर्जींचेच.. अर्पिता मुखर्जीचा दावा

By

Published : Jul 28, 2022, 3:40 PM IST

कोलकाता (पश्चिम बंगाल): एसएससी भरती घोटाळ्यातील ( SSC recruitment scam ) आरोपी पार्था चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिने जप्त केलेले पैसे पार्था चॅटर्जींचेच असल्याचा दावा केला ( Huge money recovered belongs to Partha Chatterjee ) आहे. अर्पिता मुखर्जीने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीदरम्यान हा खुलासा केला. जप्त झालेल्या रोख रकमेशी तिचा काहीही संबंध नसल्याचे तिने सांगितले.( Arpita Mukherjee ED Interrogation )

आठवड्यात तीन चार दिवस अर्पिताच्या फ्लॅटमध्ये :पार्थ चॅटर्जी हा अर्पिता मुखर्जीच्या डायमंड सिटी फ्लॅटमध्ये अधूनमधून जात असे. पार्थ चॅटर्जी आठवड्यातून तीन ते चार दिवस त्या फ्लॅटवर दुसऱ्या व्यक्तीसोबत जात असे. हे पैसे अर्पिताच्या अपार्टमेंटमधील एका खोलीत ठेवण्यात आल्याचे अर्पिताने सांगितले. अर्पितानेही दावा केला की तिला त्या खोलीत जाण्याची परवानगी नव्हती.

ईडीने जप्त केलेले पैसे

तिसऱ्या व्यक्तीसोबत बेडरूममध्ये :ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उलटतपासणीदरम्यान अर्पिताने दावा केला की पार्थ चॅटर्जी तिसऱ्या व्यक्तीसोबत बेडरूममध्ये जात असे, जेथे अर्पिताला परवानगी नव्हती. पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री त्या व्यक्तीसोबत बराच वेळ भेटीगाठी करत असत. अनेक कागदपत्रे अर्पिताला देऊन पार्थ तो फ्लॅट सोडायचा. ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली.

तीन प्रश्नांची हवीत उत्तरे :चौकशीदरम्यान, अर्पिता मुखर्जीने कबूल केले की तिच्या दोन अपार्टमेंटमधून जप्त केलेले सर्व पैसे माजी शिक्षण मंत्र्यांचे आहेत. ईटीव्ही भारतला असेही कळले की मंत्री आठवड्यातून पाच वेळा भेट देत असत. अर्पिताच्या बेलघरिया फ्लॅटमधून ईडीने सुमारे २२ कोटी रुपये जप्त केले. ईडी आता प्रामुख्याने तीन प्रश्नांची उत्तरे शोधत आहे — तिसरी व्यक्ती कोण? चटर्जी नियमितपणे अर्पिताच्या फ्लॅटवर कोणासोबत जायचे? त्या व्यक्तीचा आणि शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराचा काय संबंध? ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जीने हे प्रश्न खोडून काढले. तिने सांगितले की तिला फक्त काही कागदपत्रे ठेवण्याची परवानगी होती.

ईडीने जप्त केलेले दागिने

हेही वाचा :Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

ABOUT THE AUTHOR

...view details