महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Emergency in Sri Lanka : राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर परिस्थिती बिघडली, हजारो आंदोलक संसदेत पोहोचले

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. तेव्हापासून देशातील संकट अधिक गडद होत आहे. कोलंबोमध्ये आज पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. हजारो आंदोलक संसदेत पोहोचले आहेत. दरम्यान, श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Sri Lanka
Sri Lanka

By

Published : Jul 13, 2022, 2:59 PM IST

कोलंबो: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( Sri Lanka President Gotabaya Rajapaksa ) यांनी देश सोडल्यानंतर देशातील आर्थिक-राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हजारो आंदोलक संसदेत पोहोचले ( Thousands protesters marched on parliament ) आहेत. दरम्यान, कोलंबोमध्ये आज पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. श्रीलंकेच्या संसदेच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, राजपक्षे यांनी अद्याप राजीनामा सादर केलेला नाही. मात्र, त्यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाचा हवाला देत मीडियाने वृत्त दिले आहे की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ ( President Gotabaya Rajapaksa fled the country ) काढल्यानंतर श्रीलंकेने आणीबाणी जाहीर केली आहे. कोलंबोतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं पाहता मोठ्या प्रमाणात लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. कोलंबोतील निदर्शनांमुळे श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

आंदोलकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा : कोलंबोमध्ये, निदर्शकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थान आणि श्रीलंकेच्या कार्यालयाकडे मोर्चा ( Protesters march on the PM residence ) वळवला. श्रीलंकेतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सल्लागार हरिम पेरिस म्हणाले, "आम्हाला आशा आहे की नि:शस्त्र निदर्शक शस्त्र उचलणार नाहीत. कारण तसे झाल्यास ते कायद्याचे घोर उल्लंघन होईल." आंदोलक येथे येत असताना त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलक आता पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराकडे जात असून, विशेष दल, सशस्त्र दलही रस्त्यावर उतरवण्यात आले आहे. भिंतीवर चढून पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विशेष विमानाच्या मदतीने गोटाबाया राजपक्षे मालदीवची राजधानी माले येथे पोहोचल्याचे ( Gotabaya Rajapaksa reached Male ) सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, देशावरील संकट अधिक गडद होत आहे. कोलंबोच्या रस्त्यावर पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. मोठ्या संख्येने आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडे मोर्चा वळवला. लोकांमध्ये संताप दिसून येतो. अनेकांच्या हातात झेंडे आहेत. यापूर्वी संतप्त लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पेटवून दिले होते.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी बुधवारी देश सोडला. गोटाबाया राजपक्षे मंगळवारी रात्री उशिरा मालदीवला पोहोचले. गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कुटुंबासह स्वत:साठी सुरक्षा मागितली होती. गोटाबाया राजपक्षे यांनी अट ( Condition of Gotabaya Rajapaksa ) ठेवत सांगितले होते की, त्यांना कुटुंबासह देशाबाहेर जायचे आहे. या प्रकरणात, सुरक्षित शिपिंगची हमी दिली पाहिजे. 9 जुलै रोजी गोटाबाया यांनी 13 जुलै रोजी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. गोटाबया यांच्या राजीनाम्यावरही एक दिवस आधी स्वाक्षरी झाली होती.

हेही वाचा -China control over the moon: चंद्रावर चिनचा ताबा! ड्रॅगनच्या गुप्त हलचालींना वेग, अमेरिका-चीनमध्ये शाब्दीक युद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details