कोलंबो (श्रीलंका): श्रीलंका सरकारने रविवारी, 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर देशव्यापी सोशल मीडिया ब्लॅकआउट लागू केला आहे, असे इंटरनेट वेधशाळेने म्हटले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप, यूट्यूब, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसह सुमारे दोन डझन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रभावित झाले आहेत. रिअल-टाइम नेटवर्क डेटा दाखवत आहे की, श्रीलंकेने देशभरात सोशल मीडिया ब्लॅकआउट लागू केला आहे, व्यापक निषेधाच्या दरम्यान आणीबाणी घोषित केल्यामुळे सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बंदी लादली आहे असे ट्विट नेट ब्लाॅक ने केले आहे.
रविवारच्या नियोजित निषेधापूर्वी, बेट राष्ट्राने शनिवार ते सोमवार पर्यंत 36 तासांचा कर्फ्यू घोषित केला होता. कारण देशाला विजेचे तीव्र संकट आणि वाढत्या महागाईचा सामना करावा लागला आहे. 22 दशलक्ष लोकसंख्येच्या बेट राष्ट्राला दिवसातील 13 तासांपर्यंत ब्लॅकआउटचा सामना करणे कठीण जात आहे. कारण सरकार जवळ इंधन आयातीसाठी परकीय चलन सुरक्षित करण्यासाठी झगडत आहे. लंडन स्थित वॉचडॉगने शनिवारी श्रीलंका सरकारला चेतावणी दिली की सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली बेट राष्ट्रात आणीबाणी घोषित करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचे कारण बनू नये.