महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणा : विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांचा आकडा 30 वर - हरियाणा विषारी दारू दुर्घटना

हरियाणात विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. हे मृत्यू राज्यातील सोनीपत आणि पानिपत जिल्ह्यात झाले आहेत. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

चंदीगड
चंदीगड

By

Published : Nov 5, 2020, 10:13 PM IST

चंदीगड- गेल्या काही दिवसांमध्ये हरियाणात विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. हे मृत्यू राज्यातील सोनीपत आणि पानिपत जिल्ह्यात झाले आहेत. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

मृतांपैकी बहुतेकजण सोनीपत शहरातील गोहना रस्त्यावरील तीन निवासी वसाहतीतील आहेत. सोनीपत जिल्ह्यात अवैध दारू तयार करणार्‍या दोन युनिट्सला सील केले असून एक आरोपी अंकितला अटक करण्यात आली आहे. विषारी दारू प्यायल्यानेच हे मृत्यू झाले असल्याची शक्यता आहे, असे पोलीस उपअधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details