पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमान क्रमांक sg723 मध्ये टेक ऑफ केल्यानंतर आग ( spicejet aircraft engine fire at patna airport ) लागली. आग लागल्याचे वृत्त समजताच एकच खळबळ उडाली. मात्र, दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचे पायलटने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. या विमानात 185 लोक होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
विमानतळावरून उड्डाण करताच स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला लागली आग.. बिहारच्या पाटण्यातील घटना
पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमान क्रमांक sg723 ला टेक ऑफ केल्यानंतर आग लागली. त्यानंतर पायलटने विमानाचे सुरक्षित लँडिंग ( spicejet aircraft engine fire at patna airport ) केले. वाचा पूर्ण बातमी..
स्पाइसजेटच्या विमानाच्या इंजिनमध्ये आग : येथे पाटणा जिल्हा दंडाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. घाईघाईत अग्निशमन दलाचे पथकही विमानतळावर पोहोचले. घटनेचे कारण शोधले जात आहे. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. तपास पथकाने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. रिपोर्टनुसार, या विमानाने पाटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 12.10 वाजता उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या पंख्याला आग लागली.
अपडेट सुरु आहे...