महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Spicejet Flight Collision With Pole : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटचे विमान खांबाला धडकले - स्पाइसजेटचे विमान खांबाला धडकले

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथे स्पाइसजेटचे विमान एका खांबाला धडकले ( accident at delhi airport ) आहे. या अपघातात विमान आणि खांब दोन्हीचे नुकसान झाले आहे. कोणालाही कोणतीच इजा झाली नाही आहे.

Spicejet Flight Collision With Pole
स्पाईस जेटचा अपघात

By

Published : Mar 28, 2022, 7:19 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटचे विमान एका खांबाला धडकले ( accident at delhi airport ). त्यामुळे विमान आणि खांब दोन्हीचे नुकसान झाले आहे. विमान विमानतळाच्या धावपट्टीवर नेण्यासाठी उलटत असताना ते खांबाला धडकले आणि अपघात झाला.

स्पाईस जेट

विमानात होते प्रवाशी - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी विमान धावपट्टीवर नेण्यासाठी उलटत असताना एका खांबाला धडकले. या अपघातात खांबासह विमानाचेही नुकसान झाले आहे. हे विमान स्पाइस जेटचे असून ते दिल्लीहून जम्मूला जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. प्रवाशांनी भरलेले विमान पुन्हा धावपट्टीवर ढकलले जात होते. यादरम्यान विमान खांबाला धडकले. या धडकेत जिथे खांब आदळल्याने खाली झुकला, तिथे विमानाचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा -IPS Ramya Rides Bicycle In Midnight : मध्यरात्री सायकलवरून महिला आयपीएसने घेतला शहराचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details