महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vaishali Road Accident : भाविक पुजा करताना ट्रक धडकल्याने 12 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक - Vaishali Road Accident

मिळालेल्या माहितीनुसार, देशश्री पोलीस ठाण्याच्या नयागंज 28 तोलाजवळ हा अपघात झाला. येथे महनर मोहाद्दीनगर शेजारी असलेल्या ब्रह्मस्थानजवळ भुईं बाबाच्या पूजेदरम्यान लोक नवतान पूजा करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने लोकांना चिरडले.

रस्ते अपघात
रस्ते अपघात

By

Published : Nov 21, 2022, 7:07 AM IST

Updated : Nov 21, 2022, 10:04 AM IST

पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने अनेक मुलांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे (Eight Died In Road Accident In Vaishali). ही घटना देसरी पोलीस ठाण्याच्या नयागंज 28 तोला येथे घडली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात ( Road Accident In Vaishali ) दाखल करण्यात आले.

अपघातात आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी :मिळालेल्या माहितीनुसार, देशश्री पोलीस ठाण्याच्या नयागंज 28 तोलाजवळ हा (Deaths In Road Accident In Vaishali ) अपघात झाला. येथे महनर मोहाद्दीनगर शेजारी असलेल्या ब्रह्मस्थानजवळ भुईं बाबाच्या पूजेदरम्यान लोक नवतान पूजा करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने लोकांना चिरडले. आतापर्यंत आठ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ज्यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ट्रकखाली लोक दबले जाण्याची भीती : वेग इतका होता की, लोकांच्या गर्दीला तुडवताना ट्रक जागीच पलटी झाला. ट्रकमध्येच चालक अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रकखाली दबून अनेकांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

घटनास्थळी गोंधळ, आरडाओरडा: अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश दिसून आला . मृतांच्या संख्येबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. तसेच अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

पंतप्रधानांसह बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणाबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैशाली येथील रस्ता अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बिहारमधील वैशाली येथे झालेला अपघात दुःखद आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये दिले जातील. तर जखमींना 50 हजार देण्याात येणार असल्याची पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विटमध्ये म्हटले, की बिहारमधील वैशाली येथे झालेल्या अपघातात लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करते. जखमींना लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करते.

Last Updated : Nov 21, 2022, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details