भोपाळ :देशात सध्या दुसरी कोरोना लाट आली आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसह इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे मध्य प्रदेश ब्युरो चीफ विनोद तिवारी यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल चे (एनटीडीसी) प्रमुख डॉ. सुदीप सिंह यांच्याशी खास चर्चा केली. यावेळी सुदीप यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनाची आणखी रुपं (म्युटेशन्स) समोर येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली...
प्रश्न : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत तुम्ही काय सांगाल?
उत्तर :लोक जेव्हाही कधी कोरोनाला हलक्यात घेतील, तेव्हा देशातील रुग्णसंख्या वाढेल. लोक या महामारीबाबत गंभीर नाहीत, त्यामुळेच रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. आपल्या देशात अजूनही कित्येक लोक असे आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीजही तयार झाल्या नाहीत. तसेच आतापर्यंत सर्वांपर्यंत लसही पोहोचली नाही. अशातच लोकांनी गांभीर्य पाळले नाही, तर पुन्हा याचा प्रसार वाढणार आहे.
प्रश्न : कोरोनाच्या विविध प्रकारांबाबत तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर :कोरोनाची नवीन रुपं समोर येत आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्येही वेगवेगळे म्युटेशन्स समोर येत आहेत. खरंतर म्युटेशन कोणतेही असो, योग्य ती खबरदारी घेतली तर कोरोना टाळता येणे शक्य आहे.
प्रश्न : यूके, ब्राझील आणि आफ्रिकन म्युटंटबाबत काय म्हणाल?
उत्तर : देशात सध्या यूके स्ट्रेनचे जास्त रुग्ण नाहीत. तसेच ब्राझीलमधील कोरोना स्ट्रेनचाही देशात एकच रुग्ण आढळून आला आहे. जो तसा चिंतेचा विषय नाही.
प्रश्न : महाराष्ट्रातही एक नवा स्ट्रेन समोर आला आहे, काय म्हणाल?
उत्तर :महाराष्ट्रातही कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. याला डबल म्युटेन म्हणतात. राज्यातील १५ ते २० टक्के लोकांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.
प्रश्न : जानेवारीनंतर रुग्णसंख्या अचानक कशी वाढत आहे?