दिल्ली -पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Sidhu Moose Wala Murder ) दिल्ली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या एनडीआर पथकाने सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेला प्रमुख शूटर अंकित सिरसाला अटक केली आहे. त्यासोबत अंकितला लपण्यासाठी मदत करणाऱ्या सचिन बिवाणी याला देखील अटक करण्यात आली आहे. अंकित आणि सचिन बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगशी संबंधित आहेत. या दोघांवर राजस्थानमध्ये यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल ( Two Men In Connection Sidhu Moose Wala Murder ) आहेत.
पोलिसांनी 'या' गोष्टीही घेतल्या ताब्यात -पोलिसांच्या स्पेशल सेलने सिद्धू मुसेवाला हत्याप्रकणात सहभागी असलेल्या अंकित आणि सचिनला दिल्लीतील काश्मीरी गेट बस स्थानकाजवळ 3 जुलै ( रविवार ) रोजी अटक केली. या आरोपींजवळ दोन पिस्तुल 19 काडतुसे आणि 3 पंजाब पोलिसांचे गणवेश जप्त केले आहे.
अंकित आणि सचिन 'या' राज्यातील - अंकित आणि सचिन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगशी संबंधित आहेत. शार्प शूटर अंकित हा सोनीपतचा राहणारा आहे. अंकितवर राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच, सचिन भिवानी वर सुद्धा सिद्धू मुसेवाला प्रकरणातील शूटर्सला लपवणे आणि मदत करण्याचा आरोप आहे. सचिन हा बिश्नोई आणि गोल्डी गँगचे राजस्थानातील काम करत आहे. त्याच्यावरही राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -मानसा गावात दोन हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवाला यांच्या वाहनावर एके- ९४ मधून ३० राऊंड गोळीबार केला. कारमध्ये सिद्धूसोबत त्यांचे दोन साथीदारही होते. या अपघातात एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती.
हेही वाचा -BUS ACCIDENT IN KULLU 16 DIED: कुल्लूच्या सांज व्हॅलीमध्ये बस अपघात, १६ जणांचा मृत्यू