महाराष्ट्र

maharashtra

Lalu Yadav Fodder Scam : 139 कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी लालूंना ५ वर्षांची शिक्षा

By

Published : Feb 21, 2022, 8:51 AM IST

Updated : Feb 21, 2022, 2:06 PM IST

चारा घोटाळा ( Fodder Scam Case ) प्रकरणी सीबीआय न्यायालय आज लालू यादव यांना शिक्षा सुनावणार झाली. विशेष सीबीआय न्यायालयानं 15 फेब्रुवारी रोजीच लालूप्रसाद यांना 139 कोटींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ( CBI Court will sentence Lalu Yadav Today ) ठरवलं होतं. हे या घोटाळ्यातील पाचवं आणि सर्वांत मोठं प्रकरण होतं. आज त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Lalu Yadav Fodder Scam
Lalu Yadav Fodder Scam

पाटणा -राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा असणार आहे. देशातील सर्वात मोठ्या 950 कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या ( Fodder Scam Case ) (डोरांडा ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपयांचा अपहार) दोरांडा ट्रेझरी प्रकरणात सीबीआयचे विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयानं 15 फेब्रुवारी रोजीच लालूप्रसाद यांना 139 कोटींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ( CBI Court will sentence Lalu Yadav Today ) ठरवलं होतं. हे या घोटाळ्यातील पाचवं आणि सर्वांत मोठं प्रकरण होतं. त्यांना आज पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

लालू प्रसाद यांच्यावर 120B, 420, 467, 409, 468, 471, 477A, IPC आणि 13(1), 13(2), PC Act अंतर्गत या घोटाळ्यात कट रचल्याचा आरोप आहे. नियमाअंतर्गत किमान 1 वर्ष आणि कमाल 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. लालू यादव यांना 7 वर्षांची शिक्षा झाली तर तर संपूर्ण कुटुंबासाठी अडचणी येऊ शकतात.

डोरांडा चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सुधांशु कुमार शशी यांनी याप्रकरणी लालू प्रसाद यांच्यासह एकूण 99 आरोपींबद्दल निकाल दिला होता. यात माजी मंत्री डॉ. आर के राणा, आमदार ध्रुव भगत आणि जगदीश शर्मांसारख्या राजकीय नेत्यांव्यतिरिक्त बिहारचे तत्कालीन अर्थ सचिव बेक ज्युलियस, रांचीचे तत्कालीन आयुक्त अधीर चंद्र चौधरी, डोरंडा ट्रेझरी ऑफिसचे अधिकारी महेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक कंत्राटदार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयानं 24 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. तर 34 जण दोषी आढळले होते.

याआधी लालूंना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये (देवघरमधील एक, दुमका कोषागारातील एक आणि चाईबासा कोषागाराशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये) दोषी ठरवण्यात आले आहे.

पहिले प्रकरण - चाईबासा कोषागार, 37.7 कोटींचा घोटाळा -

लालू प्रसाद यादव यांना 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईबासा ट्रेझरी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 30 सप्टेंबर 2013 रोजी सर्व 45 आरोपींना दोषी ठरवले होते. लालूंसह हे आरोपी चाईबासा कोषागारातून 37.70 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी दोषी आढळले. या प्रकरणी न्यायालयाने 3 ऑक्टोबर 2013 रोजी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा झाली.

दुसरे प्रकरण - देवघर कोषागार, 84.5 लाखांचा घोटाळा -

देवघर कोषागारातून 84.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 23 डिसेंबर 2017 रोजी लालू प्रसाद यांना दोषी ठरवण्यात आले होते. तर 6 जानेवारी रोजी त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासोबतच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

तिसरे प्रकरण : चाईबासा कोषागारात ३३.६७ कोटींचा घोटाळा

1992-93 मध्ये 67 बनावट वाटप पत्रांच्या आधारे चाईबासा कोषागारातून 33.67 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. याप्रकरणी 1996 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये एकूण 76 आरोपी होते. 24 जानेवारी 2018 रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवून 5 वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षेसोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

चौथे प्रकरण - दुमका कोषागारतून 3.13 कोटींचा घोटाळा

दुमका कोषागार हे प्रकरण डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 दरम्यान दुमका कोषागारातून 3.13 कोटी रुपयांचे बेकायदेशीरपणे काढण्यात आले होते. 24 मार्च 2018 रोजी सीबीआय कोर्टाने या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना वेगवेगळ्या कलमांमध्ये 7-7 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा -राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन

Last Updated : Feb 21, 2022, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details