'महाशिवरात्री'चा पवित्र सण माता गौरी आणि भगवान शंकर यांचा विवाहसोहळा दिन म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भक्त भगवान शंकराच्या पूजेसोबत उपवासही करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय लोकांचे कार्यातील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान करून भक्त स्वत: भगवान शिवाला दूध, दही, तूप, मध, चंदनाचा अभिषेक करतात. यानंतर महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग, धतुरा, मदार फूल, पांढरे चंदन, पांढरी फुले, हंगामी फळे, गंगेचे पाणी, गाईच्या दुधाने भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते. यानंतर शिवाला विविध प्रकारचे भोग अर्पण केले जातात.
शिव पार्वतीची पूजा :महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा माता पार्वतीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे असे मानले जाते. दोघांची पूजा केल्याने धन-धान्य, सुख-समृद्धीचे वरदान मिळते. अशी आख्यायिका आहे की, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की, असे कोणते व्रत आहे, ज्याद्वारे मरणभूमीतील प्राणी सहज तुमचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात? ज्याच्या प्रत्युत्तरात भगवान शिवाने पार्वतीला 'शिवरात्री' व्रताचा उपाय सांगितला. तेव्हापासून महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
विविध गोष्टींचा सहभाग :काही ठिकाणी या दिवशी शंकराची मिरवणूकही काढली जाते. लहान मुलांना भगवान शिव आणि माता पार्वतीचे रूप दिले जाते. या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी होऊन भगवान शंकराचा आशीर्वाद घेतात. जाणून घेऊया भगवान महादेवाला कश्याप्रकारचा नैवेद्य अर्पण करु शकतो ते.