नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महागाईविरोधातील हल्लाबोल रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. (Congress party Halla Bol rally) ते म्हणाले की यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यांनी माझी 55 तास चौकशी केली, पण 5 वर्षे 55 तास चौकशी केली तरी मी घाबरणार नाही. असा घणाघात त्यांनी केला आहे.
भारताला कमकुवत केले - रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. (Rahul Gandhi strongly criticized the Modi government) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान द्वेष पसरवून भारताला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.