तामिळनाडू :दक्षिण भारताला पहिली वंदे भारत ट्रेन ( Vande Bharat Express ) मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Modi ) यांनी म्हैसूर ते चेन्नई दरम्यान नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. चेन्नईतील एमजी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्थानकावरून या ट्रेनची चाचणी यापूर्वीच करण्यात आली होती. म्हैसूर-चेन्नई वंदे भारत ट्रेन ही भारतातील पाचवी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल. याशिवाय केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटनही पीएम मोदी करणार आहेत. या नवीन प्रकल्पांचा उद्देश शहराला चांगली कनेक्टिव्हिटी देणे हा आहे. ( India Gets 5th Vande Bharat Express )
मोदींनी दाखवला हिरवा झेंडा :पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली. यानंतर आणखी तीन गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवण्यात आल्या आहेत. यातील नवीनतम ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दिल्ली-उना मार्गावर हिरवा झेंडा दाखवून प्रवासाचा वेळ कमी केला आणि मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारली. ही ट्रेन सुविधा आणि वेगाच्या दृष्टीने भारतीय रेल्वेच्या पुढील महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.