महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonia Gandhi meets Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्याबरोबर सोनिया गांधींची बैठक, गुजरात निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची काय भूमिका असावी, याबाबत काँग्रेसमध्ये दीर्घकाळपासून ( Prashant Kishor Gujarat Assembly elections ) चर्चा सुरू आहे. अशातच प्रशांत किशोर यांनी सोनियांच्या नवी दिल्लीतील अधिकृत 10 जनपथ निवासस्थानी रणनीती बैठकीला ( Sonias official 10 Janpath residence ) हजेरी लावली. यावरून काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात करार झाल्याचे स्पष्ट झाले ( Congress and Prashant Kishor deal ) आहे.

By

Published : Apr 16, 2022, 5:24 PM IST

प्रशांत किशोर
प्रशांत किशोर

नवी दिल्ली -आगामी गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने ( Gujarat Assembly election congress ) तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबरोबर बैठकीत चर्चा ( Sonia Gandhi meets Prashant Kishor ) केली. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह आणि इतर काही नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे हे बंगळुरूमध्ये होते. मात्र, त्यांना बैठकीसाठी तातडीने हजर ( Mallikarjun Kharge meeting Prashant Kishor ) राहावे लागले.

गुजरातची सोपविली जबाबदारी- चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची काय भूमिका असावी, याबाबत काँग्रेसमध्ये दीर्घकाळपासून ( Prashant Kishor Gujarat Assembly elections ) चर्चा सुरू आहे. अशातच प्रशांत किशोर यांनी सोनियांच्या नवी दिल्लीतील अधिकृत 10 जनपथ निवासस्थानी रणनीती बैठकीला ( Sonias official 10 Janpath residence ) हजेरी लावली. यावरून काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात करार झाल्याचे स्पष्ट झाले ( Congress and Prashant Kishor deal ) आहे. काँग्रेसने गेल्या वर्षी प्रशांत किशोर यांच्याकडेच पक्षाची निवडणूक रणनीती सोपविण्याची चर्चा केली होती. मात्र, त्याला अंतिम स्वरुप येऊ शकले नाही. गुजरातमधील निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ( election strategy in Gujarat ) पक्षाने प्रशांत किशोर यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याचे दिसत आहे.

प्रशांत किशोर यांनी अमरिंदर सिंग यांना केली होती मदत- यापूर्वी, प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील व्हायचे होते. त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षात महत्त्वाची भूमिका बजावायची इच्छा होती. मूळ राज्य बिहारमध्ये जास्त वेळ घालवायची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवली होती. परंतु त्यानंतर राष्ट्रीय भूमिका हवी असल्याने प्रशांत यांनी स्वतःला पंजाबमधील राजकारणापासून दूर केले. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी अमरिंदर यांना मदत केली होती. 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी निवडणूक रणनीती तयार केली होती. काँग्रेस-समाजवादीमध्ये युती घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र, त्यांचा हा प्रयोग अयशस्वी झाला.

गुजरातची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची-आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्यांच्या वाचाळपणाची जाणीव काँग्रेसला झाली आहे. गुजरातमधील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आम आदमी पक्षालापासून धोका आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. कारण, गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसला गुजरातमधील निवडणुकीत अपयश येत आहे. महत्त्वाच्या आहेत. 2017 मध्ये, गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली, परंतु ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. यावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये सत्ता मिळविण्याचे काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा-प्रशांत किशोर-शरद पवारांची भेट ही राजकीय उलाथापालथ करणारी घटना नाही - संजय राऊत

हेही वाचा-शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर गोपीचंद पडळकरांची टीका, म्हणाले....

हेही वाचा-प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश...राजस्थानच्या महसूल मंत्र्यांचे स्पष्ट संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details