हुबळी (कर्नाटक) : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज शनिवार कर्नाटकमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. राज्याची लूट करणाऱ्यांना जनता 10 मे रोजी उत्तर देईल. येथील निवडणूक सभेत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानाचा अप्रत्यक्षपणे हवाला देत त्या म्हणाल्या की, कर्नाटकला कोणत्याही नेत्याच्या आशीर्वादाची गरज नाही. कारण, राज्यातील जनता त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे असा थेट टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
भाजपवाले घटनात्मक संस्थांना आपल्या खिशात आहे असे मानतात : भाजपच्या 'अंधेरानगरी' विरोधात आवाज उठवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुखांनी केले. सोनिया गांधी यांनी आरोप केला की, 'डाकडा हा सत्तेत असलेल्यांचा धंदा झाला आहे. त्यांनी (भाजप) लुटमार करून सत्ता बळकावली आहे. यानंतर त्यांच्या 40 टक्के सरकारने जनतेची लूट सुरू केली आहे. 'भारत जोडो यात्रे'चा उल्लेख करून त्यांनी दावा केला की, 'या यात्रेने भाजपला इतके घाबरवले आहे की, सर्व प्रकारच्या दडपशाहीचा मार्गाचा अवलंब यांनी केला असही त्या म्हणाल्या आहेत. त्यांचे नेते कोणत्याही प्रश्नाला किंवा पत्राला उत्तर देत नाहीत. ते घटनात्मक संस्थांना आपल्या खिशात आहे असे मानतात असा थेट आरोप त्यांनी केला आहे.