नवी दिल्ली: काँग्रेसने शुक्रवारी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर श्वसनमार्गाच्या संसर्गावर आणि कोविड-19 नंतरच्या गुंतागुंतांवर उपचार सुरू ( Sonia Gandhi undergoes treatment ) आहेत. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये 'फंगल इन्फेक्शन' ( Fungal infections of the respiratory tract ) आढळून आले आहे.
ते म्हणाले की, हा संसर्ग आणि कोविड-19 संसर्गानंतरची गुंतागुंत ( post-Covid symptoms ) लक्षात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड-19 नंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 जून रोजी सोनिया गांधी (75 वर्षीय) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षांना नवीन समन्स जारी केले आहेत.