नवी दिल्लीSonia Gandhi Admitted : छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना काही दिवसांपासून छातीत त्रास होत असल्याची तक्रार होती. नियमित तपासणीसाठी गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असं रुग्णालयानं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी 76 वर्षांच्या असून त्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. नुकत्याच त्या विरोधी पक्षाच्या भारत आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबईत गेल्या होत्या.
सोनिया गांधी रुग्णालयात दाखल : दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील सूत्रांनी रविवारी सांगितलं की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सौम्य तापाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधी यांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं एक पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्याची या वर्षातील ही तिसरी वेळ आहे. जानेवारीमध्ये त्यांना व्हायरल ताप तसंच छातीत संसर्ग झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मार्चमध्ये त्यांना पुन्हा तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
गांधींच्याप्रकृतीत सुधारणा :सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. बैठकीवरून परतल्यानंतर शनिवारी रात्री सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना सौम्य तापाची लक्षणे दिसू लागल्यानं त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं रुग्णालयानं सांगितलं आहे.
'या' वर्षात तिसऱ्यांदा रुग्णायलात दाखल : विशेष म्हणजे या वर्षात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही तीसरी वेळ आहे. जानेवारीमध्ये, 76 वर्षीय माजी काँग्रेस प्रमुख असलेल्या सोनिया गांधी यांना व्हायरल श्वसन संक्रमणाच्या उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
- Narendra Modi : भारतात भ्रष्टाचार, जातीयवादाला अजिबात थारा नसेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Special session of Parliament : संसदेचं विशेष अधिवेशन आहे तरी काय एवढं खास...
- Lalu Prasad Yadav on INDIA Alliance : देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी अहंकार सोडून एकत्र यावं - लालू प्रसाद यादव