महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonbhadra fossil park: 1400 दशलक्ष जुने जिवाश्वम पाहता येणार, 'या' शहरात सुरू होणार अनोखे पार्क

UP First Fossil Park : सोनभद्र इथं उत्तर प्रदेशातील पहिलं जीवाश्म उद्यान तयार केलं जाणार आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांना 1400 दशलक्ष वर्षे जुनी जीवाश्म पाहायला मिळणार आहेत. युनेस्कोच्या हेरिटेज यादीतही या उद्यानाची नोंद करण्याची तयारी सुरू आहे.

UP First Fossil Park
UP First Fossil Park

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 10:48 AM IST

लखनौ UP First Fossil Park : उत्तर प्रदेश पर्यटन विभागानं अमेरिकेतील यलोस्टोन पार्कनंतर युनेस्कोमध्ये सालखान जीवाश्म उद्यानाजवळ असलेल्या आशियातील सर्वात जुन्या जीवाश्म उद्यानाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाचा दावा आहे की, अंदाजानुसार हे जीवाश्म उद्यान सुमारे 1400 दशलक्ष वर्षे जुनं आहे. हे जीवाश्म उद्यान पाहण्यासाठी जगभरातील जीवाश्मशास्त्रज्ञ आणि पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. अशा परिस्थितीत या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विभागानं या ठिकाणाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग यांनी ही माहिती दिलीय.

काय म्हणाले पर्यटन मंत्री जयवीर सिंग : याविषयी मंत्री जयवीर सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा परिसर जागतिक पटलावर आणायचा Eus. ही बाब लक्षात घेऊन या जीवाश्म उद्यानाचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसंच त्यांनी सांगितलं की, अलीकडेच विभागाच्या पथकानं बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसाइन्सेसचे संचालक डॉ. एमजी ठक्कर यांच्यासह या उद्यानाला भेट दिली होती. या वेळी टीमला असं आढळलं की सोनभद्रमध्ये अनेक नैसर्गिक रचना आहेत. हे पर्यटक आणि जीवाश्म प्रेमींसाठी एक अतिशय आकर्षक ठिकाण असू शकतं. अशा स्थितीत हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विभागानं आराखडा तयार करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलंय.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास : इथं उपस्थित असलेल्या विविध प्रकारच्या जीवाश्मांच्या पाहणीवरून असं दिसून येतं की विविध श्रेणीतील प्राणी वेगवेगळ्या कालखंडात राहत होते. त्यांच्या अवशेषांपासून इथं असे आकार तयार झाले आहेत. त्यामुळे हे स्थळ वैज्ञानिकांना आकर्षित करत आहेत. मंत्री म्हणाले की, याशिवाय सोनभद्र जिल्ह्यात अशी इतरही अनेक नैसर्गिक ठिकाणे पर्यटक भेट देतात. तेही पर्यटन म्हणून विकसित केले जाऊ शकतात. इथं अनेक दऱ्या आणि धबधबे आहेत. अशा परिस्थितीत या ठिकाणाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केल्यास या भागाचा विकास तर होईलच. त्याचबरोबर येथे राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नातही भर पडेल. त्यामधून हजारो रोजगारही निर्माण होतील, असंही पर्यटन मंत्री जयवीर सिंग म्हणाले.


हेही वाचा :

  1. Elvish Yadav Clarification Video : सापाच्या विषाची तस्करी करत असल्याचा आरोपाचं एल्विश यादवनं केलं खंडन
  2. UP Crime News : पतीने परदेशात न नेल्याचा राग; पत्नीची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या
  3. UP Budget 2023 : योगी सरकारचा आज अर्थसंकल्प, अनेक लोकप्रिय घोषणांची शक्यता, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details