पणजी : हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यातील अंजुना समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. या खुनातील मुख्य आरोपी सुधीर सांगवान याला गोव्यातील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोनाली सोफाट यांचा ऑगस्ट 2022 मध्ये अंजुना बीचवरील समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. आरोपी सुधीर सांगवान याने त्याच्या साथीदारासोबत सोनाली फोगाटला ड्रग्ज पाजून मारले होते.
सुधीर सांगवान याला या अटींवर दिला जामीन :सुधीर सांगवान हा सोनाली फोगाट खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने गोव्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी सुधीर सांगवान याला एक लाख रुपयांच्या जामीनपत्रावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने सुधीर सांगवानला राज्याबाहेर जाण्यास मनाई केली असून दर शुक्रवारी सीबीआय ( CBI ) समोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती सुधीर सांगवानच्या वकिलाने दिली आहे.
गोवा पोलिसांनी केली होती अटक :सोनाली फोगाट या हरियाणातून गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग हे दोघेही त्यांच्यासोबत होते. मात्र 22 आणि 23 ऑगस्टच्या रात्री सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी तिला एका रिसॉर्टमध्ये नेले त्यानंतर तिथे नंतर नाईट क्लबमध्ये पार्टी करताना सोनाली फोगाट यांना जबरीने अंमली पदार्थ पाजल्याचा आरोप करण्यात आला होता. अंमली पदार्थाच्या ओव्हरडोसमुळे सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला.