गोवा -भाजपा नेत्या सोनाली फोगाट मृत्यूबाबत Sonali Phogat Case PM report एक नवीन माहिती पुढे आली आहे. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. या संदर्भातील माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकरांंनी दिली आहे. तर सोनालीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग्य तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने केली आहे. सोनाली फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर सागवांन आणि सुखविंदर यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. Sonali Phogat murder case
दोघांवर हत्येचा गुन्हा दाखलभाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अंजुना पोलिसांनी तिच्यासोबत गोव्याला गेलेल्या सुधीर पाल व सुखविंदर संगवान या दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी फोगट यांचे निधन झाले होते. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. आयपीसी 302 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शवविच्छेदनाला कुटुंबीयांचा होता आक्षेप :सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत पावलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनाला त्यांच्या कुटुंबीयांनी हिरवा कंदील दिला होता. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात फोगाट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूपूर्वी सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार व खून केल्याचा आरोप Sonali Phogat family sensational allegations त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर पाल आणि सुखविंदर संगवान यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.