पणजीसोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गोव्यात तिचे सहकारी सुधीर संगवन व सुखविंदर पाल यांना शुक्रवारी अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी आता आपल्या तपासाची सूत्र हरियाणाच्या दिशेने वळवली आहेत. प्रॉपर्टी हडप करण्याच्या हेतूने ही हत्या केल्याचं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात अजून किती आरोपी सहभागी आहेत याचा शोध गोवा पोलीस घेणार आहेत.
सोनालीच्या दोन साथीदारांसह अन्य दोघे पोलिसांच्या ताब्यातसोनाली फोगाट यांच्या मृत्यू पूर्वी तिचे सहकारी सुधीर संगवान व सुखविंदर सिंग पाल हे तिच्यासोबत एका पब मध्ये नाचत असतानाचा एक व्हिडिओज समोर आला. त्यानंतर त्याचवेळी तिला विषारी द्रव्य देऊन तिची हत्या करण्यात आली. पण हे विषारी द्रव्य बनवणाऱ्या त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्याच्या घडीला गोव्यातून सोनाली फोगाटच्या चार मारेकर्यांनी मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी करलिस क्लबचे मालक एडीविन नुनिस आणि ड्रॅग पेडलर दत्तप्रसाद गावकर यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी कर्लीस बार ताब्यात घेऊन त्याला टाळे ठोकलेत. club woner of Goa and peddler detained. फोगट यांना कारलीस बारमध्ये नेऊन तिच्यावर विष प्रयोग करून तिची हत्या केल्याचा आरोप या दोन्ही आरोपींवरती आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान फोगाट यांची हत्या ही प्रॉपर्टी हडप करण्याच्या हेतूने केली होती अशी दोन्ही आरोपींनी कबुली दिलीय. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिचे सहकारी सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांना कोर्टाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फोगाट कुटुंबीयांची करणार कसून चौकशीसोनाली फोगाट यांचा सोमवारी तिचे पीए व एका अन्य सहकार्याने विष देऊन हत्या केली होती, असे प्रथमदर्शनी प्राथमिक अहवालात स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता तिची संपत्ती हडप करण्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या प्रकरणात या आरोपींसह तिच्या नातेवाईक व कुटुंबियातील किती लोक सहभागी आहेत, याची चौकशी आता गोवा पोलीस करणार आहेत.