जयपूर - राज्यातील तीन जागांवरील पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने एकमेव राजसमंद जागा जिंकली, परंतु काँग्रेसचे आमदार विश्वेंद्रसिंग यांचे पुत्र अनिरुद्ध यांनी केलेले ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. या ट्विट माध्यमातून सत्ताधारी काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानेच काँग्रेस पक्षावरच अनेक प्रश्न उपस्थित केले.
जयपूर; काँग्रेसचे आमदार विश्वेंद्रसिंग यांचे पुत्र अनिरुद्ध यांचे काँग्रेसवरच गंभीर आरोप - Jaipur News
राजस्थानमधील तीन जागांवरील पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने एकमेव राजसमंद जागा जिंकली आहे.

राजस्थान
दरम्यान, माजी मुख्यमंत्री सचिन पायलट गटाचे काँग्रेसचे आमदार विश्वेंद्रसिंग यांचे पुत्र अनिरुद्ध यांनी राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या विजयाबद्दल स्थानिक भाजप खासदार दीया कुमारीचे अभिनंदन केले. तसेच या अभिनंदन दरम्यानच अनिरुद्ध यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, लोकशाही दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाने सर्व प्रयत्न करूनही भाजपने विजय मिळवला आहे. या केलेल्या ट्विटमुळे राज्स्थानमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे आहे.