सांगली: सांगलीतील चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम ( इंग्लड ) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) आहे. नुकतेचं तिची बहिण काजल सरगरने खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते. आता संकेत सरगरचे देखील पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते ( Sanket Sargar father tea seller )आहे.शहरातला संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे.सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल या ठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दांपत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहिण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत.