महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

क्रुरकर्मा.. मुलाने आईची हत्या करून अंगणात जाळले अन् चितेवर कोंबडी भाजून खाल्ली - आईची हत्या करून अंगणात रचली चिता

मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातील जोजोगुट्टू गावात समोर आली आहे. एका विक्षिप्त तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या चितेवर कोंबडी भाजून खाल्ल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे.

son killed his mother
son killed his mother

By

Published : Jan 30, 2021, 8:30 PM IST

चाईबासा - मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातील जोजोगुट्टू गावात समोर आली आहे. एका विक्षिप्त तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या चितेवर कोंबडी भाजून खाल्ल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी आरोपीला दोरीने बांधून त्याला पोलिसांकडे सोपवले. मनोहरपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सांगितले जात आहे, की चार वर्षापूर्वी आरोपीने आपल्या वडिलांचीही हत्या केली होती. त्याप्रकरणात तुरुंगवास भोगून बाहेर आला आहे. प्रधान सोय (वय ३५ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.

प्रधान सोय याने आपल्या आईची हत्या केली व घराच्या अंगणातच तिची चिता रचली. त्याचे कौर्य एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याने चितेवर कोंबडी भाजून खाल्ली. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यानची आहे. शनिवारी सकाळी त्याने आपल्या आईचा अर्धा जळालेला मृतदेह घरातील चुलीत घालून जाळला. मृत महिलेचे नाव सुमी सोय (६० वर्ष) आहे. घटनेची माहिती शनिवारी सकाळी आरोपीची भाभी सोमवारी सोय यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून बांधून ठेवले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.


प्रधान सोय याची भाभी सोमवारी सोय यांनी सांगितले, की शुक्रवारी रात्री ती व तिची सासू झोपण्याची तयारी करत होते. त्यावेळी प्रधान सोय दारू पिऊन घरात आला व आईला काठीने मारू लागला. त्यानंतर सोमवारी आपल्या एक महिन्याच्या मुलाला घेऊन घराबाहेर एका झाडाआड लपली. त्यानंतर प्रधान सोयने घराच्या अंगणात आपल्या ६० वर्षीय आईला काठीने मारहाण करत तिची हत्या केली व अंगणातील लाकडे, भुसा एकत्र करून आईची चिता रचली. जळत्या चितेवर प्रधानने कोंबडी भाजून खाल्ल्याचे त्याच्या भाभीने पाहिले. त्यानंतर तो घरात झोपण्यास निघून गेला. शनिवार सकाळी जेव्हा भाभी घराजळ गेली तेव्हा प्रधान आपल्या आईचा अर्धाकच्चा जळालेला मृतदेह घरात नेऊन चुलीत घातल होता. या घटनेने भदरलेल्या भाभीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रधानचे हात-पाय बांधून पालिसांच्या ताब्यात दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details