महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Son Fulfill Mother Last Wish : हृदयस्पर्शी : आईचा मृतदेह घरात ठेवून मुलाने केले मंदिरात लग्न; वाचा नेमके काय झाले... - आईचा मृतदेह घरात ठेवून केले मंदिरात लग्न

आईचा मृतदेह घरी ठेवून मुलगा लग्न करत ( Son married in temple by keeping mother dead body ) होता. ही धक्कादायक घटना धनबाद जिल्ह्यातील आहे. मात्र त्याचे सत्य समोर आल्यावर सर्वांचे डोळे ओलावले. यानंतर सगळ्यांना कळले की ओम कुमारने स्वतःच आईचा मृतदेह घरात ठेवून मंदिरात लग्न का केले.

Son Fulfill Mother Last Wish
आईचा मृतदेह घरात ठेवून मुलाने केले मंदिरात लग्न

By

Published : Jul 9, 2022, 9:08 PM IST

धनबाद (झारखंड) : जिल्ह्यातील केंदुआडीह पोलीस स्टेशन परिसरातील न्यू मेरिन गोपालीचक येथे एक धक्कादायक आणि हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या ओम कुमारने आपल्या आईचा मृतदेह घरात ठेवून मंदिरात लग्न केले आहे. ( Son married in temple by keeping mother dead body )

आईचा मृतदेह घरात ठेवून मुलाने केले मंदिरात लग्न

लग्न ठरलेले मात्र आईचा झाला मृत्यू - धनबादमध्ये एक अनोखा विवाह पाहायला ( unique wedding in dhanbad ) मिळाला आहे. आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने आईचा मृतदेह घरात ठेवून मंदिरातच लग्न केले. यानंतर घरातील मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीएल कर्मचारी बैजनाथ तुरी यांचा मुलगा ओम कुमार याचा विवाह बोकारो पेटारवार पोलीस स्टेशन हद्दीतील उतासारा येथील रहिवासी मनोज तुरी यांची मुलगी सरोज तुरी हिच्यासोबत निश्चित झाला होता. 10 जुलै रोजी दोघेही थाटामाटात लग्न करणार होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या ओमच्या आईचा गुरुवारी रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आईची इच्छा होती - मृत्यूनंतर मुलगा ओमने आईचा मृतदेह घरी आणला. मृतदेह घरी ठेवून ओमने जवळच्या शिवमंदिरात सरोजशी लग्न केले. मंदिरातही लोकांची गर्दी झाली होती. लग्न झाल्यानंतर ओम पत्नी सरोजसह घरी पोहोचला. ओम आणि त्यांची पत्नी सरोज यांनी घरी आईचा मृतदेह उचलून डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेतले. यानंतर ओमने तेलमाचो स्मशानभूमीत आईचे अंत्यसंस्कार केले. ओम सांगतो की, त्याच्या आईची इच्छा होती की तिच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्याचे लग्न व्हावे. त्यामुळे आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा -Misbehave With Woman : लज्जास्पद : जमीनीच्या वादातून महिलेला मारहाण करुन केले मुंडन, 5 दिवसांनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details