महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Angry Teen Swallowed 27 spikes in MP : किती हा राग; वडील रागावल्याने अल्पवयीन मुलाने खाल्ली 27 खिळे - son ate iron 21 spikes in MP

ग्वालियर येथे आपल्या वडीलांना आपल्यावर रागवल्याचा राग मनात ठेऊन एका अल्पवयीन मुलाने 27 खिळे ( Angry Teen Swallowed 21 spikes in MP ) खाल्ली. 17 वर्षीय अल्पवयीन तरूणाला पोटात दुखू लागल्यानंतर जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. जेव्हा डॉक्टरांनी मुलाची एक्स-रे काढला तेव्हा त्यांचे डोळेच चक्रावले. त्याच्या पोटात डॉक्टरांना डझनभरापेक्षा अधिक लोखंडाचे  खिळे दिसून आले.

Angry Teen Swallowed 21 spikes in MP
अल्पवयीन मुलाने खाल्ली 21 खिळे

By

Published : Dec 7, 2021, 4:53 PM IST

Updated : Dec 7, 2021, 5:16 PM IST

ग्वालियर ( मध्यप्रदेश ) -मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने वडील रागवल्याचा राग मनात धरून चक्क 27 खिळे खाल्याची ( Angry Teen Swallowed 21 spikes in MP ) घटना उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्याने ही बाब निदर्शनास आली. मुलाच्या पोटातील खिळे काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

एक्स-रेत दिसले डझनभर लोखंडाचे खिळे -

ग्वालियर येथे आपल्या वडीलांना आपल्यावर रागवल्याचा राग मनात ठेऊन एका अल्पवयीन मुलाने 27 खिळे खाल्ली. 17 वर्षीय अल्पवयीन तरूणाला पोटात दुखू लागल्यानंतर जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. जेव्हा डॉक्टरांनी मुलाची एक्स-रे काढला तेव्हा त्यांचे डोळेच चक्रावले. त्याच्या पोटात डॉक्टरांना डझनभरापेक्षा अधिक लोखंडाचे खिळे दिसून आले. डॉक्टरांच्या टिमने दिड तास ऑपरेशन करून त्या खिळ्यांना पोटातून बाहेर काढले. आता मुलाची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

21 दिवसापूर्वी खाल्ली होती खिळे -

ग्वालियर शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले त्यावेळी 17 वर्षीय धनंजयच्या पोटात खूप दुखत होते. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टर वीरेंद्र महेश्वरी यांनी सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा मुलाची तपासणी केली तेव्हा आमचे डोळेच चक्रावले. तरूणाने 21 दिवसापूर्वी खिळे खाल्ली होती. त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले.

हेही वाचा -LPG Gas Cylinder Weight : घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी - हरदिप सिंग पुरी

Last Updated : Dec 7, 2021, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details