हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ज्यामध्ये शनिवार आणि सोमवारी येणारी अमावस्या तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता माघ महिना सुरू आहे, 6 फेब्रुवारी 2023 रोजी फाल्गुन महिना सुरू होईल. यंदा फाल्गुन महिन्यातील अमावस्याला सोमवती अमावस्या म्हटले जाणार आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपर्यात दिवा लावा. दिवा तयार करण्यासाठी लाल रंगाचा धागा वापरा. हा उपाय केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल. असे मानले जाते की, सोमवती अमावस्येला भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्यास जीवनातील सर्व संकटे आणि ग्रहदुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तीर्थस्नान, नैवेद्य आणि दान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबाला सौभाग्य प्राप्त होते.
सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त : फाल्गुन महिन्यात येणारी सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.4 वाजता सुरू होईल आणि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.55 वाजता समाप्त होईल. या दिवशी पूजा, उपवास, स्नान आणि दान केल्याने अनेक यज्ञांचे फळ मिळते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करावे.
सोमवती अमावस्येचे महत्त्व :सोमवती अमावस्या हा हिंदू धर्माचा सण मानला जातो. महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिराला सोमवती अमावस्येचे महत्त्व समजावून सांगितले आणि सांगितले की, जो व्यक्ती या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो तो निरोगी, समृद्ध होतो आणि सर्व दुःखांपासून मुक्त होतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्चे दूध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा, असे सांगितले जाते. यामुळे इच्छा लवकर पूर्ण होतात. भोलेनाथ स्वतः भक्तांचे दुःख हरण करतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात. हे व्रत करवाचौथप्रमाणे फलदायी मानले जाते, असे सांगितले जाते.
कधी आणि किती वेळा येते? :सोमवती अमावस्या दरवर्षी २-३ वेळा येते. सोमवती अमावस्येला भगवान शिव, माता पार्वती आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधी आहे. सोमवती अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध विधी करणे हे इतर अमावस्यांपेक्षा अधिक पुण्यपूर्ण मानले जाते. फाल्गुन सोमवती अमावस्या - 20 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. त्यानंतर सावन सोमवती अमावस्या - १७ जुलै २०२३ रोजी आहे. कार्तिक सोमवती अमावस्या - १३ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे.
हेही वाचा : Gajanan Maharaj Prakatdin 2023 : यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन; धुमधडाक्यात होणार साजरा