सॅन फ्रान्सिस्को - इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून त्याची सेवा पूर्वीसारखी मोफत मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी भाष्य केले आहे. (Elon Musk talks about Twitter) त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की या प्लॅटफॉर्मच्या व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. सामान्य वापरकर्त्यांबाबतची परिस्थितीही त्यांनी स्पष्ट केली आहे.
इलॉन मस्क यांनी "ट्विटर नेहमी सामान्य वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक/सरकारी वापरकर्त्यांसाठी थोडासा खर्च होऊ शकतो" असे ट्विट केले आहे. ट्विटरचा पूर्ण ताबा घेण्यास अजून वेळ आहे. असे असूनही, लोक अजूनही ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांच्याकडून नोकऱ्या मागत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे सोशल मीडिया पेज नोकऱ्यांच्या विनंत्यांनी भरले आहे. तथापि, बहुतेक लोकांनी त्याच्याकडून गंमतीने नोकरीच्या विनंत्या केल्या आहेत.