नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवार (दि. 12 डिसेंबर)रोजी लोकसभेत विरोधकांवर घणाघात केला. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे तेव्हा त्यावर सतत टीका करू नये. तर त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. 2014 पूर्वी केवळ रुपयाच वाईट स्थितीत नव्हता तर पुर्ण संपूर्ण अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत होती असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार ए. रेवंत रेड्डी यांनी पुरवणी प्रश्न विचारताना डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या विधानाचा हवाला देत आज रुपया ८३ च्या पुढे गेला आहे, मग सरकार त्याला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सीतारामन बोलत होत्या. "पंतप्रधान (गुजरातचे) मुख्यमंत्री असताना त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सदस्यांनी त्या काळातील (२०१४ पूर्वी) अर्थव्यवस्थेचे इतर संकेतक लक्षात आणून दिले असते तर बरे झाले असते. त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात होती. तसेच, त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पाच सर्वात कमकुवत ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यामध्ये समाविष्ट होती असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
रुपयाची किंमत 83.20 - तेलंगणातील काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे एक जुन्या विधानाचा यावेळी लहावा दिला. ज्यामध्ये 'रुपया आयसीयूमध्ये पडून आहे, हे देशाचे दुर्दैव आहे की मोदी सरकारला देशाची काळजी नाही. तसेच, आज सरकारला आपली खुर्ची वाचवण्याची चिंता लागली आहे. रुपया पडण्याची चिंता नाही, कृती आराखडा नाही. जेव्हा डॉलरची किंमत 66 रुपये होती, तेव्हा ते म्हणाले की रुपया वाईट स्थितीत आहे. आता रुपयाची किंमत 83.20 आहे. 83.20 असेल तर याचा अर्थ आपण थेट शवागारात जात आहोत. यावर त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शवागारातून पैसे परत आणण्यासाठी काही कृती योजना आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर अर्थमंत्री म्हणाल्या 'पंतप्रधान मुख्यमंत्री असताना त्या काळातील विधान पुढे करून हे प्रश्न विचारत आहेत, ते अगदी योग्य आहे. हा प्रश्न विचारला पाहिजे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, 'कोणाला काय विचारायचे आणि काय नाही हे मी ठरवेन. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, रेड्डी यांनी अवतरणासह त्या काळातील इतर सर्व संकेतकांची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.