महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indira Gandhi Death Anniversary : 'आर्यन लेडी' इंदिरा गांधी यांची 40 वी पुण्यतिथी; जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी - इंदिरा गांधी पुण्यतिथी

राजकारणात असतांना आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'आर्यन लेडी' इंदीरा गांधी (Indira Gandhi) यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी, 40 वी (40th death anniversary of Aryan Lady Indira Gandhi) पुण्यतिथी. जाणुन घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी. Indira Gandhi Death Anniversary

Indira Gandhi Death Anniversary
आर्यन लेडी

By

Published : Oct 23, 2022, 4:14 PM IST

Updated : Oct 31, 2022, 12:52 PM IST

दिवंगत काँग्रेस नेत्या आणि भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधानांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी, त्यांनी घडवुन आणलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून हत्या केली. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना त्यांनी केलेल्या अनेक सुधारणांसाठी ओळखले जात होते. आयर्न लेडीच्या (40th death anniversary of Aryan Lady Indira Gandhi) पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. Indira Gandhi Death Anniversary

आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी प्रयागराज येथे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या पोटी झाला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलत्या एक अपत्य इंदिरा गांधी यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सखोल संबंध होता. इंदिरा गांधींनी लहानपणी 'मंकी ब्रिगेड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुलांचा एक गट तयार केला होता, जो भारतीय झेंडे वाटायचा आणि पोलिसांची हेरगिरी करत असे.

इंदिरा गांधी 1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि 1964 मध्ये राज्यसभेच्या सदस्य झाल्या. 1966 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली. इंदिरा गांधी, देशातील एकमेव महिला पंतप्रधान होत्या. त्यांना बँकांचे राष्ट्रीयीकरण व सुधारणांसाठी ओळखल्या जाते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि ऑपरेशन ब्लू स्टार यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवले.

पाकिस्तान विरुद्ध 1971 च्या युद्धात भारताचा विजय आणि बांगलादेश राष्ट्राच्या निर्मितीनंतर, गांधींना भारतरत्न देण्यात आला. 1975 मध्ये, त्यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि निवडणुकीत गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांना सहा वर्षांसाठी राजकारणातून बंदी घातली गेली. जनता पक्षाचे सरकार पडल्यानंतर 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या. 1984 मध्ये पंजाबच्या बंडखोरीला तोंड देण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टारचा भाग म्हणून हरमंदिर साहिबवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती.

इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. अंगरक्षकांनी इंदिरा गांधींवर 31 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 23 गोळ्या त्यांच्या शरीरातून गेल्या होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. Indira Gandhi Death Anniversary

Last Updated : Oct 31, 2022, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details