डेहराडून Soldier Martyred In Pulwama : भारतीय सैन्य दलातील जवानाला पुलवामामध्ये गुरुवारी वीरमरण ( Soldier Martyred In Pulwama ) आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक सिंह असं पुलवामात वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. दीपक सिंह हे उत्तराखंडमधील गंगोलीहाटचे राहणारे होते. त्यांना एक वर्षाचा मुलगा असून त्याचा सांभाळ दीपक सिंह यांची बहीण करत होती. मात्र आता पित्यालाही वीरमरण आल्यानं त्यांचा मुलगा पोरका झाला आहे.
वीर जवानाच्या पत्नीचंही झालं आहे निधन :गंगोलीहाट इथले वीर जवान दीपक सिंह यांना पुलवामा इथं वीरमरण आलं आहे. त्यामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली. दीपक सिंह यांना एक मुलगा असून त्यांच्या पत्नी हिमानी देवी यांचं तीन महिन्यापूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला त्यांची बहीण कोसुरी देवी या संभाळत आहेत. आईच्या निधनानंतर वडिलांनाही वीरमरण आल्यानं एक वर्षाचा चिमुकला मुलगा पोरका झाला आहे. त्यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दीपक सिंहनं घेतलं होतं पॅरा कंमांडोचं प्रशिक्षण :गंगोलीहाट इथले दीपक सिंह हे 2015 ला भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. दीपक सिंह हे पुलवामा जिल्ह्यातील किरू इथं तैनात होते. मात्र कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं. दीपक सिंह हे दोन आठवड्यांपूर्वीच सुटीवर गावी आले होते. मात्र सुटी संपवून परत आपल्या युनिटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना वीरमरण आलं. दीपक सिंह यांनी भारतीय सैन्य दलातील खडतर असं पॅरा कंमांडोचं प्रशिक्षण घेतलं होतं.
दीपक सिंह यांचं पार्थिव शुक्रवारी पोहोचणार गंगोलीहाटला :पुलवामा इथं भारतीय सैन्य दलातील जवान दीपक सिंह यांना वीरमरण आल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. दीपबक सिंह यांचं पार्थिव जम्मू काश्मीर युनिटमधून अध्याप पोहोचलेलं नसल्याची माहिती गंगोलीहाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगल सिंह नेगी यांनी दिली आहे. वीर जवान दीपक सिंह यांचं पार्थिव शुक्रवारी सायंकाळपर्यंत गंगोलीहाटला पोहोचेल, अशी माहितीही पोलीस निरीक्षक मंगल सिंह नेगी यांनी यावेळी दिली.
हेही वाचा :
- Sanjay Raut on Pulwama : पुलवामा दहशतवादी हल्ला निवडणुकीसाठीचा घोटाळा, सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवावा- संजय राऊत
- Pulwama Encounter : पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू, जवानांचा परिसराला वेढा