काशीपूर (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये एका मुलाने रागाच्या भरात असे काही कृत्य केले की, त्याच्या हल्ल्यात वडील जखमी झाली. वडिलांची बोटे आणि प्रायव्हेट पार्ट कापणाऱ्या सैनिक मुलगा आणि त्याच्या मित्रांविरुद्ध काशीपूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मुख्य आरोपी आणि त्याचे मित्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. त्याच्या अटकेसाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत. सैन्यात असलेल्या या मुलाने वडिलांनीज्याप्रकारे हल्ला करून त्यांच्या हाताची बोटे अन् प्रायव्हेट पार्ट कट केला त्यावरून पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशीपूरच्या काचनाल गाझी कुमाऊं कॉलनीतील रहिवाशाने याप्रकरणी तक्रार दिली होती. त्याने सांगितले की, 26 डिसेंबरच्या संध्याकाळी त्याच्या मुलाने त्याच्या तीन मित्रांसह त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या डाव्या हाताची बोटे आणि प्रायव्हेट पार्टही कापला. त्याच्या मुलासह एकूण चार जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे पीडिताने सांगितले. यापैकी तो मुलाच्या दोन मित्रांना ओळखतो, परंतु तो एकाला ओळखत नाही. त्याच्या मुलाशिवाय, रोहित वर्मा आणि राहुल सैनी अशी पीडितेने ओळखलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही काशीपूरचे रहिवासी आहेत.