नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ( telangana CM KCR on PM narendra modi ) टीका केली होती. यावर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार प्रत्युत्तर ( Ramdas Athawale Criticize KCR ) दिले आहे. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे विधान बरोबर नाही. जर तुम्ही आम्ही त्यांना कन्याकुमारीतून 3 महासागरात बुडवू अशी जोरदार टीका राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी केली आहे.
केसीआर यांची भाजपावर टीका -
के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी टिका करताना म्हटले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून ह्यायला हवे, आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवे.' असे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले होते.