महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंबईत मुलाचा मृत्यू, 17 दिवसांनंतरही कुटुंबीयांना मिळाले नाही मृत्यू प्रमाणपत्र - उत्तराखंड बातमी

उत्तराखंड राज्यातील पिथौरागड जिल्ह्यातील एका गावातील सूरज नावाच्या मुलाचा 17 जुलैला मुंबईत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अद्यापपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना सूरजच्या शवविच्छेदनाचा अहवाल व मृत्यूचे प्रमाणपत्र मिळाले नाही.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Aug 2, 2021, 4:10 PM IST

देहराडून (उत्तराखंड) - पिथौरागड जिल्ह्यातील बेरीनाग तहसील कार्यालयाच्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गराऊ गावातील सूरज (21 वर्ष) याचा 17 जुलैला मुंबईमध्ये रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र व शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप मिळाला नाही.

सूरजच्या कुटुंबीयांनी मांडलेली व्यथा

मृत सूरजचे वडील सोबन राम म्हणाले, सूरज हा परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबईला गेला होता. 17 जुलैला छत्रपति शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे पोलिसांचा फोन आला. ते म्हणाले, सूरज कुमार याचा मृतदेह रेल्वेरुळावर कटलेल्या स्थितीत सापडला आहे. त्यानंतर सोबन राम यांनी पोलिसांना मुंबईला येऊ शकत नसल्याचे सांगितले व शवविच्छेदनानंतर अंत्यविधी करुन मृत्यू प्रमाणपत्र पाठविण्याबाबतही ते पोलिसांना बोलले. आता त्या घटनेला 17 दिवस झाले तरीही सूरजच्या कुटुंबीयांना शवविच्छेदनाचा अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नाही.

सूरजची आई मुन्नी देवी म्हणाल्या, मुलाच्या मृत्यूची सूचना मिळाली त्याच्या दोन तासांपूर्वी फोनवरुन सूरजशी बोलणे झाले होते. सूरजचा अपघाती मृत्यू नसून त्याची हत्या झाली आहे, असा आरोपी मुन्नीदेवी यांनी केला आहे. याबाबत चौकशी व्हावी, अशा आशयाचे पत्र त्यांनी खासदार अजय टम्टा व महाराष्ट्रचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पाठवले आहे.

हेही वाचा -सागर धनकर हत्या प्रकरण: दिल्ली पोलीस आज करणार पहिले आरोपपत्र दाखल, सुशिल कुमारसह आहेत 12 आरोपींची नावे

ABOUT THE AUTHOR

...view details