महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

snake bite man for five time in agra आग्रा येथे तरुणाला सलग पाचवेळा एकाच जागी चावा, सुदैवाने प्राण वाचले - snake bite cases in Agra

आग्रा येथून सर्पदंशाची विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी रजत चहर नावाच्या तरुणाला गेल्या 10 दिवसात 5 वेळा साप ( snake bite man in agra ) चावला. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.

snake-bite-man-for-five-time-in-agra
snake-bite-man-for-five-time-in-agra

By

Published : Sep 16, 2022, 7:03 PM IST

आगरा :उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे रजत चहर नावाच्या २० वर्षीय तरुणाच्या मागे एक विषारी साप लागला आहे. गेल्या 10 दिवसांत सापाने रजतला एक-दोनदा नव्हे तर चक्क 5 वेळा चावा घेतला ( snake bite man in agra ) आहे. रजतचे नशीब बलवत्तर म्हणून उपचारानंतर तो आता सुखरूप आहे. मात्र, सातत्याने साप चावण्याच्या घटनांमुळे रजत आणि त्याच्या कुटुंबीयांने सापांचा धसका घेतला आहे.

आग्राच्या दक्षिणेकडील बायपासवरअसलेल्या मालपुरा भागातील मंकेडा गावात डाव्या पायाला चावणारा साप हा कुतूहलाचा विषय बनला आहे. मनकेडा गावात राहणारा रजत चहर हा २० वर्षीय तरुण पदवीधर आहे. रजतला साप चावल्याची चर्चा आजूबाजूच्या गावात पोहोचली आहे. कुटुंबीय त्याची सतत काळजी घेत आहेत. रजतची प्रकृती चांगली असली तरी भीती कायम आहे. रजतचे वडील राम कुमार चहर यांनी सांगितले की, मुलाच्या डाव्या पायाला साप वारंवार चावत आहे. ( snake bite man for five time in agra )

वडील राम कुमार चहरयांनी सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी रजत रात्री 9 वाजता घराबाहेर चालला होता. त्याचवेळी सापाने डाव्या पायाला चावा घेतला. प्रथम त्याला घरगुती उपचार देण्यात आले. त्यानंतर त्याला एस. एन. मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, जिथे सर्पदंशाची लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले. 4 तासांनंतर रजतला पुन्हा घरी पाठवण्यात आले.

वडिलांनी सांगितले की, याच दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी रजत घराबाहेरील बाथरूममध्ये असताना तेव्हा पुन्हा त्याच पायाला त्याच जागेवर पुन्हा सापाने दंश केला. उपचारासाठी आग्रा-ग्वाल्हेर रस्त्यावरील मुबारकपूर गावात नेण्यात आले. यानंतर 11 सप्टेंबर रोजी घरातील खोलीत, 13 सप्टेंबर रोजी बाथरूममध्ये पुन्हा साप चावला. वडिलांनी सांगितले की, 14 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुलगा बूट घालत असताना सापाने चावा घेतला. त्याची प्रकृती ठीक असली तरी सातत्याने साप चावा घेत असल्याने कुटुंबियांनी सापाचा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे रजतला वारंवार सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने रजतच्या घरी त्याला पाहण्यासाठी जमले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details